Marathi News> मुंबई
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

हा निर्यण येताच ....

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे. सत्ता स्थापन करण्यात निर्माण झालेला एकंदर पेच आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात आली. ज्यामध्ये बुधवारीच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. हा निर्यण येताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. 

ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी आपलं मत मांडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल जाहीर होताच, राऊट यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं. इतक्यावरच न थांबता त्यांनी आणखी एक ट्विट केलं. ज्यामध्ये, 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता.... जय हिंद!' असं लिहिलं. माध्यमांशी संवाद साधतानाही त्यांनी आपली न्यायव्यवस्था अतिशय पारदर्शक असल्याचं म्हणत न्यायव्यवस्थेचे आभार मानले. न्यायालयात सत्य पराभूत होऊ शकत नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

fallbacks

'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'

न्यायालयाचा निर्णय पाहता राऊत यांनी केलेलं हे टविट काही क्षणांतच अनेकांचं लक्ष वेधून गेलं. मुख्य म्हणजे मंगळवारी महाविकासआघाडीने १६२ आमदारांसह केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर राऊत यांनी, '१६२ एँड मोर.... जस्ट वेट एँड वॉच... ' असंही एक ट्विट केलं होतं. बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठीची शिवसेना आणि मित्रपक्षाची तयारी पाहता आता साऱ्या देशाच्या नजरा बुधवारी होणाऱ्या बहुमत चाचणीकडे असेल. 

Read More