Marathi News> मुंबई
Advertisement

सरकारमध्ये नाराजी आहे; पण.... संजय राऊतांचा खुलासा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती 

सरकारमध्ये नाराजी आहे; पण.... संजय राऊतांचा खुलासा

मुंबई : 'सरकार तीन पक्षांचे आहे. त्यात नाराजी आहे, पण तरीही ते टिकेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती', असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त 'सामना रोखठोक' या सदरात म्हटलं आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काल एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्तानं 'सामना'त लिहिलेल्या लेखात संजय राऊत यांनी सरकार स्थापनेच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर, विरोधकांकडून घेतले जाणारे आक्षेप व केल्या जाणाऱ्या भाकितांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. 'महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

'ठाकरे सरकार' हे नैसर्गिक मानावेच लागेल. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी ३३ भिन्न विचारांच्या पक्षांचे 'एनडीए' सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे? असा सवालही राऊतांनी यावेळी केला आहे. 

'सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच ‘ठाकरे सरकार’ही नैसर्गिक मानावेच लागेल. 

Read More