Marathi News> मुंबई
Advertisement

तुकडे तुकडे गॅंगच्या कानाखाली जाळ काढा, 'सामना'त लष्करप्रमुखांचे कौतुक

 सामनातून लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या भुमिकेचे समर्थन आणि कौतुक 

तुकडे तुकडे गॅंगच्या कानाखाली जाळ काढा, 'सामना'त लष्करप्रमुखांचे कौतुक

मुंबई : देशाचे तुकडे पाडणाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याऐवजी त्यांच्या कानाखाली अखंड भारताच्या नकाशाचा जाळ उठवला पाहीजे असे मत सामनातून व्यक्त केले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पाकव्यात काश्मीर भारताचाच भाग असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भुमिकेचे सामनातून समर्थन करण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येच सर्वाधिक दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण केंद्र असून या सर्वाला पाकिस्तानी लष्कराचा पाठींबा असल्याचे लष्करप्रमुख नरवणे यांनी म्हटले होते.

काश्मीरच्या मुद्द्यावर आतापर्यंत केवळ राजकारणच झाले असल्याने नरवणे यांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करतो असे सामनातून म्हटले आहे. 

पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण हे भारताचा भाग असल्याचा ठराव १९९४ साली भारताच्या संसदेत ठरला होता.

पाकिस्तानने काश्मीरवरील बेकायदेशीर ताबा सोडून द्यायला हवा. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर हे लक्ष्य असल्याचे पंतप्रधानांनी सर्व भाषणात सांगितले होते.

त्यामुळे संसदेचा असा ठरवा असल्याने केंद्राने तसा आदेश दिल्यास पाकचे कंबरडे मोडून काढू असे नरवणे यांनी म्हटले होते. या भुमिकेला सामनातून पाठिंबा देण्यात आला. 

राऊतांचा टोला

देशाचे तुकडे पाडणाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याऐवजी त्यांच्या कानाखाली अखंड भारताच्या नकाशाचा जाळ उठवला पाहीजे असे मत सामनातून व्यक्त केले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पाकव्यात काश्मीर भारताचाच भाग असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भुमिकेचे सामनातून समर्थन करण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येच सर्वाधिक दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण केंद्र असून या सर्वाला पाकिस्तानी लष्कराचा पाठींबा असल्याचे लष्करप्रमुख नरवणे यांनी म्हटले होते. काश्मीरच्या मुद्द्यावर आतापर्यंत केवळ राजकारणच झाले असल्याने नरवणे यांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करतो असे सामनातून म्हटले आहे. 

Read More