Marathi News> मुंबई
Advertisement

आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात

आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : राज्यातील अनेक व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

आदित्य ठाकरे यांना आधी 'वाय प्लस' सुरक्षा देण्यात आली होती. आता ती 'झेड' करण्यात आली आहे. तर, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सचिनला आता 'एक्स' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अण्णांना यापूर्वी 'वाय प्लस' सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेचा दर्जा वाढवण्यात आला असून त्यांना आता 'झेड' सुरक्षा देण्यात आली आहे. 

भारत सरकारकडून करण्यात आलेल्या एका पर्यवेक्षणातून काही व्यक्तींची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणजेच आमदार आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एकूण २९ व्यक्तींच्या सुरक्षा व्य़वस्थेत बदल करण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात ९७जणांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुरक्षा पर्यवेक्षणातून वेळोवेळी सुरक्षेचे निकष पाहता त्याचा अहवाल घेऊन त्या अनुषंगाने यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. 

Read More