Marathi News> मुंबई
Advertisement

उत्सव गणरायाचा, ‘वर्षा’व बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा! मुख्यमंत्री शिंदेचं व्यंगचित्र चर्चेत

Political News : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवात प्रथमच शेतकरी आपतग्रस्त कष्टकरी जनांचा सहभाग पाहायला मिळाला. 

उत्सव गणरायाचा, ‘वर्षा’व बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा! मुख्यमंत्री शिंदेचं व्यंगचित्र चर्चेत

Political News : गणेशोत्सवाची धूम सर्वांनीच पाहिली, हा उत्साह नाही म्हटला तरी प्रत्येकानं अनुभवला. एका वेगळीच उर्जा अनेकांना जाणवली आणि प्रत्येकानं आपल्या परिनं हा सोहळा साजरा केला. यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्रासाठी खास होता. बऱ्याच संकटांना, राजकीय उलथापालथीला तोंड देऊन झाल्यानंतर राज्यात एक छान चित्र पाहायला मिळालं. या सणाचं विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेला गणेशोस्तव. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी संपन्न झालेल्या गणेशोत्सवाची दखल सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. यावर शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेज वरुन यावर भाष्य करणारे व्यंगचित्रही पोस्ट करण्यात आले.  वर्षा बंगल्यावर यंदाच्या वर्षी पार पडलेल्या गणेशोत्सवात इर्शाळवाडी ग्रामस्थ, वारकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, महिला, उद्योजक, विदेशी प्रतिनिधी अशा समाजातील सर्वच स्तरातील प्रतिनिधींचा समावेश होता. 

गणेश उत्सव हा आनंदाचा सोहळा आहे, तो सर्वांसोबत साजरा करण्यात आला पाहिजे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उदात्त हेतू मनी ठेवून सर्वस्तरातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. इर्शाळवाडी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले वर्षावर दाखल होताच तो क्षण वर्षावरील सर्वांसाठी भावुक करणारा होता. दहा दिवसांत समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी साकडे घालत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत यासाठी मनोकामना केली. 

सर्वांना एकत्र आणणारे हे क्षणी खूप काही सांगून गेले. काही माणसं आणि त्यांची कामं कायम लक्षात राहतात. कदाचित यंदाचा गणेशोत्सव हा त्याच लक्षात राहणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Read More