Marathi News> मुंबई
Advertisement

वर्षभरात पैसे दुप्पट! 125% रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये अमिताभ यांचीही गुंतवणूक

Amitabh Bachchan Investment In Stock Market: तुम्ही सुद्धा मोबाईलवरुन किंवा खासगी स्तरावर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना एखाद्या चांगल्या रिटर्न्स देणाऱ्या कंपनीच्या शोधात असेल तर ही कंपनी एक फारच उत्तम पर्याय आहे.

वर्षभरात पैसे दुप्पट! 125% रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये अमिताभ यांचीही गुंतवणूक

Amitabh Bachchan Investment In Stock Market: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची संपत्ती नुकतीच चर्चेत आली होती. अमिताभ यांनी आपल्या मालकीचा 50 कोटींचा 'प्रतिक्षा' बंगला मुलगी श्वेताला भेट म्हणून दिला. अमिताभ हे कोट्यधीश आहेतच पण त्यांची सून ऐश्वर्या राय, मुलगा अभिषेक बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांच्याकडेही कोट्यवधीची संपत्ती आहे. पैशाने पैसा वाढवतो असं म्हणतात. त्याचप्रमाणे अमिताभ हे सुद्धा उत्तम गुंतवणूकदार आहेत. 81 वर्षीय अमिताभ बच्चन हे मोठ्या पडद्याबरोबरच केबीसीच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही सक्रीय आहेत. याचबरोबर अमिताभ बच्चन शेअर बाजारामध्ये आणि स्टॉकच्या व्यवहारामध्येही फारच सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन अनेकदा वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात. अमिताभ हे मोठा नफा मिळवण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करतात. अमिताभ यांनी नुकतीच एका कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी वर्षभरामध्ये गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट करुन देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

कोणती आहे ही कंपनी?

अमिताभ यांनी मध्य प्रदेशमधील एका कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट झाल्यापासून दर वर्षी 125 टक्के रिटर्न्स आपल्या गुंतवणुकदारांना देते. डीपी वायर्स असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी धातूच्या तारा म्हणजेच वायर्स बनवते. या कंपनीचा विकासदर फारच प्रभावित करणार आहे. 1971 पासून या कंपनीने दरवर्षी 50 हजार टन उत्पादन घेते. आता हे उत्पादन 70 हजार टनांपर्यंत वाढवण्याच्या तयारीत कंपनी आहे. म्हणजेच या कंपनीमधील गुंतवणूकदारांना भविष्यातही फायदा होणार आहे.

अमिताभ यांचे किती शेअर्स?

बीएसईच्या सध्याच्या उपलब्ध डेटानुसार, अमिताभ बच्चन यांनी कंपनीमधील जवळपास 1.27 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. म्हणजेच अमिताभ यांच्याकडे कंपनीचे 1,96,556 शेअर्स आहेत. या शेअर्सचा सध्याचा बाजार भाव हा 11.95 कोटी रुपये इतका आहे. मंगळवारी 19 डिसेंबर रोजी कंपनीच्या एका शेअरचा दर 608 रुपये इतका होता. सेबीच्या नियमानुसार, कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये 1 टक्क्यांहून अधिक भागीदारी असेल तर त्या व्यक्तीचं नाव जाहीर करावं लागतं. अमिताभ बच्चन यांनी यांच्या मालकीतील काही वाटा विकला आहे. मात्र तरीही त्यांच्याकडील या कंपनीतील भागीदारी ही एका टक्क्याहून अधिक आहे. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीमध्ये अमिताभ यांची एकूण भागीदारी 2.45 टक्के इतकी होती.

आयपीओ आला तेव्हा किंमत होती फारच कमी

डीपी वायर्सने 21 सप्टेंबर 2017 साली आपला आयपीओ बाजारात आणला होता. त्याच वर्षी 5 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा ही कंपनी बाजारात लिस्ट झालेली. त्यावेळी या कंपनीचा प्रत्येक शेअर केवळ 75 रुपयांना होता. 19 डिसेंबर 2023 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 608 रुपये इतकी आहे. म्हणजेच कंपनीने लिस्टिंगनंतर आतापर्यंत तब्बल 810 टक्के रिटर्न्स दिलेत. म्हणजेच आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचा पैसा तब्बल 9 पटींनी वाढला आहे.

कंपनी फारच उत्तम स्थितीमध्ये

डीपी वायर्स कंपनीची सध्याची स्थिती फारच उत्तम आहे. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये 272.79 कोटी रुपये महसुल गोळा केला. जूनच्या तिमाहीमध्ये 265.74 कोटी रुपये महसुल गोळा केला. त्याशिवाय कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये 9 कोटींहून अधिक नफा मिळवला. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीला 11 कोटींचा नफा झाला. 13 डिसेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 677.80 रुपये भावाने वर्षभरातील सर्वोच्च स्थानी होते.

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)

Read More