Marathi News> मुंबई
Advertisement

'पवारांनी 120 कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं'; एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा आरोप

न्यायालयाच्या निर्णयानंतर आज एसटी कर्मचारी ( ST Workers ) अचानक आक्रमक होत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आक्रमक आंदोलन केलं. 

'पवारांनी 120 कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं'; एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा आरोप

मुंबई :   न्यायालयाच्या निर्णयानंतर आज एसटी कर्मचारी ( ST Workers ) अचानक आक्रमक होत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आक्रमक आंदोलन केलं.  या आक्रमक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( NCP CHIEF SHARAD PAWAR ) यांच्या 'सिल्वर ओक' ( Silver Oak ) या निवासस्थानी गराडा घातला आहे. हे आंदोलक शरद पवार यांच्या विरोधात घोषणा देत होते. पवारांच्या विरोधात त्यांनी अक्रोश करीत घोषणाबाजी केली.. 

आज सायंकाळी 3.30 नंतर मोठ्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल केला. पवार यांच्या घरावर चप्पला, तसेच दगडफेकही करण्यात आली. एसटीचे विलीनीकरण न होण्याला पवारच जबाबदार असल्याचा आरोप, आंदोलनकर्ते करीत होते.

आक्रमक आंदोलनकर्ते म्हणत होते की, 'शरद पवार यांनी विलीनकरण होऊ दिले नाही. त्यांनीच विलीनकरणाला अडथळा आणला. 120 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना पवारच जबाबदार आहेत. त्यांनी आमचं कुंकू पुसलं. शरद पवार हाय हाय. अजित पवार हाय हाय..आमची विलीनकरणाची मागणी पूर्ण झाली नाही तर, आम्ही बारामतीतही आक्रोश करणार..' असा इशाराही कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.

आक्रमक एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शांत करण्यासाठी स्वतः खासदार सुप्रिया सुळे देखील घटनास्थळी पोहचल्या. त्यानंतर पोलिसांची कुमक तेथे आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन बसेस मधून गावदेवी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.

Read More