Marathi News> मुंबई
Advertisement

Sharad Pawar Health Issue : शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे मानले आभार, केले हे ट्विट

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती (Sharad Pawar Health) रविवारी बिघडली. त्यानंतर त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sharad Pawar Health Issue : शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे मानले आभार, केले हे ट्विट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती (Sharad Pawar Health) रविवारी बिघडली. त्यानंतर त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत पवारांना पित्ताशयाचे निदान झाले आहे. पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकांकडून विचारपूस करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फोनवरुन चौकशी केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनीही प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत मोदी यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्याता आले आहेत. रविवारी सायंकाळी पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पित्ताशयाचं निदान झाल्यानंतर पवारांवर आता शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ३१ मार्च रोजी पवार रुग्णालयात दाखल होणार आहे. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे आभार

शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली जात आणि त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान, प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत. आता मोदी यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, माझे सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मित्रमंडळींनी व सुहृदांनी आवर्जून तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केले, संदेश ठेवले. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांचे बळ मिळाले. मनपूर्वक धन्यवाद!, असे पवार यांनी ट्विट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!, असे पवारांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!, अशा शब्दात पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच महसूलमंत्री बाळासाहे थोरात, भाजपचे नेते सुरेश प्रभू, आशिष शेलार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आदींना त्यांची चौकशी करत लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्यात.

लता मंगेशकर यांचे आभार

माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read More