Marathi News> मुंबई
Advertisement

Ghatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, मोठ्या होर्डिंगबाबत घेतला निर्णय

Ghatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, 18 मोठे होर्टिंग हटवले 

Ghatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, मोठ्या होर्डिंगबाबत घेतला निर्णय

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : 13 मे 2024 रोजी घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील 18 जाहिरातींचे मोठे होर्डिंग हटवले आहे. या होर्डिंगवर सर्वोच्च न्यायालयाने कारवाई केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे. त्यानुसार चार महाकाय होर्डिंग्ज काढण्यात आली, तर 14 होर्डिंग्जची उंची कमी करण्यात आली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी मध्य रेल्वेकडे कारवाईची माहिती मागितली होती. त्यानुसार मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांनी त्यांना कारवाई केलेल्या होर्डिंग्जची यादी दिली आहे. यादीनुसार 14 पैकी चार होर्डिंग्ज कायमस्वरूपी हटविण्यात आली आहेत. त्यामध्ये रोशन स्पेस यांची दोन, तर पायोनियर आणि अलख यांच्या प्रत्येकी एका होर्डिंगचा समावेश आहे

उंची कमी केलेल्या 14 होर्डिंग्जमध्ये देवांगी आऊटडोअरचे 7, रोशन स्पेसचे 2, झेस्ट एंटरप्राइजचे 2, तर वॉललोप, कोठारी आणि मेसर्स नुकलेसईट्स यांच्या प्रत्येकी एका होर्डिंगचा समावेश आहे

'या' परिसरातील होर्डिंग्ज काढून टाकलेले

टिळक नगर
सँडहर्स्ट रोड
चुनाभट्टी

आकार कमी केलेले होर्डिंग्ज

चुनाभट्टी
भायखळा
सुमन नगर
टिळक नगर
वाडी बंदर

पश्चिम रेल्वेचे मात्र तोंडावर बोट

अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेचे जनमाहिती अधिकारी सौरभ कुमार यांच्याकडे मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत पश्चिम रेल्वे प्रशासनाने कारवाईची माहिती देणे टाळले आहे

Read More