Marathi News> मुंबई
Advertisement

संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य...

राज्यसभेसाठी शिवसेना दोन जागा लढविणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेवर जातील आणि ते पक्के शिवसैनिक असतील. 

संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य...

मुंबई : संभाजीराजे छत्रपती ( SAMBHAJIRAJE CHATRAPATI ) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) यांनी त्यांना शिवबंधन बांधा मग उमेदवारीचा विचार करू असे सांगितले आहे. यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात अली आहे. मात्र, त्यापूर्वीच  शिवसेना प्रवक्ते संजय राऊत ( SANJAY RAUT ) यांनी एक मोठे विधान केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली. जेव्हा कुणी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करतो तेव्हा त्यांनी मतांची बेगमी केलेली असते. जिंकून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता असते. ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली त्यावेळी त्यांना कुणी पाठिंबा दिला असेल काय झाले असते ते माहित नाही. त्यात पडणे आमचे काम नाही.

त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. पण, असे लक्षात आले की त्यांच्याकडे मते नाहीत. त्यांनी आमच्याकडे मते मागितली. परंतु, शिवसेनेचं दोन जागा असताना आम्ही अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा का द्यावा? यासाठी त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली.

शिवसेना ( SHIVSENA ) हे मराठी माणूस आणि हिंदुत्व ( HINDUTVA ) याचे संघटन आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री ( CHIEF MINISTER ) शिवसेनेचा आहे असे असताना राज्यसभेच्या निवडणुकीत दोन उमेदवार शिवसेनेचे निवडून जातील. आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे अपक्ष नाही. यासाठी आम्ही संभाजीराजे यांना तुम्ही एक पाऊल मागे या आम्ही दोन पावले मागे येतो असे सांगितले. तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा असे त्यांना सांगितले.

राज्यसभेवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवार जातील. त्यामुळे कोणत्याही अपक्षाला आम्ही पाठिंबा देणार नाही. त्यांना समर्थन देण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्नच नाही. ही माझी 'मन की बात नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनची बात आहे.' कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेवर जातील आणि ते पक्के शिवसैनिक असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

    

Read More