Marathi News> मुंबई
Advertisement

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण, नागपुरातील त्या व्यक्तीला पोलीस कोठडी

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी किल्ला न्यायालयाने नागपुरातील त्या व्यक्तीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण, नागपुरातील त्या व्यक्तीला पोलीस कोठडी

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील 'सिलव्हर ओक' या राहत्या घरावर काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या प्रकरणातील आरोपी असलेल्या संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Sandeep Godbole Police Custody) सुनावण्यात आली आहे. किला कोर्टात गोडबोलेचा जबाब सुनावण्यात आला. (sandeep godbole remanded in police custody for 2 days in connection with attack on sharad pawar silver oak house)
 
बुधवारी मुंबई पोलिसांनी नागपुरातून संदीप गोडबोलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर आज किला कोर्टात हजर करण्यात आलं.

संदीप गोडबोलेचा न्यायालयातील जबाब

सदावर्ते यांच्या घरी 7 तारखेला झालेल्या बैठकीला हजर नव्हतो. सदावर्तेंनी कॉल करुन मैदानातील परिस्थिती विचारली आणि 12 एप्रिलच्या कार्यक्रमावर फोकस करायला सांगितल्याचा जबाब गोडबोलेने दिलाय.

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचं तपासात समोर आल्यानंतर गोडबोलेला नागपूरमधून मुंबईत आणण्यात आलं. गोडबोले आणि अभिषेक पाटील यांच्या संभाषणाची क्लिप पोलिसांच्या हाती आली आहे. जयश्री पाटील यांनी हा हल्ला झालाच पाहिजे यासाठी प्रोत्साहन दिले, असा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलाय.

प्रदीप घरत काय म्हणाले?

दरम्यान न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात काय झालं, याबाबतची सविस्तर माहिती दिली. 

"गोडबोले आणि अभिषेक पाटील यांच्या संभाषणाची क्लिप पोलिसांच्या हाती आली आहे. जयश्री पाटील यांनी हा हल्ला झालाच पाहिजे यासाठी प्रोत्साहन दिले होते. गोडबोले यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून वकील नाही, नियमित कोर्टात गेल्यावर वकील करेल असं सांगितलं.म्हणून कोर्टने त्याला काही बोलायचे का विचारले तेव्हा गोडबोले यांनी ही कबुली दिली",अशी माहिती घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

दरम्यान सिल्वहर ओक हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने पोलीस कोठडी 2 वेळा पोलीस कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर आज सदावर्ते यांची 14 दिवसांसाठी  न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Read More