Marathi News> मुंबई
Advertisement

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. 

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्या हल्लाप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला  (Attack on MNS leader Sandeep Deshpande) करण्यात आला. सुदैवाने यात देशपांडे यांना गंभीर दुखापत झाली नाही.  त्यांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं. मनसे पदाधिकाऱ्यांकडून राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येतं आहे. दरम्यान संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत कैद (Suspect caught on CCTV) झाले आहेत. (Sandeep Deshpande Attack Suspect caught on CCTV mumbai Maharashtra Politics News in marathi)

कधी झाला हल्ला?

संदीप देशपांडे यांच्यावर 3 मार्च 2023 ला शुक्रवारी दादर शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करताना हल्ला झाला. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचावर हल्ला केला. आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोऱ्यांचा शोध घेत आहे. हल्लानंतर संदीप देशपाडे यांना हिंदूजा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मनसेतील आक्रमक नेते म्हणून संदीप देशपांडे यांची ओळख आहे. ते अनेक विषयांवर समाजमध्यम आणि सोशल मीडियावरुन आक्रमक भूमिका मांडत असतात. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झालाचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केला आहे.

एवढंच नाही तर अमेय खोपकर यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.

 

आणखी एक सीसीटीव्ही फूटेज समोर!

दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संदीप देशंपाडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये (mumbai news) चौघांकडून जीवघेणा हल्ल्या झाल्याचं समोर आलं आहे. या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून 8 पथकं तयार करण्यात आले आहेत. 

 

 

Read More