Marathi News> मुंबई
Advertisement

100 कोटींचा आरोप : अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर तर सचिन वाझेला कोर्टाची समज

 Anil Deshmukh's cross-Check : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) पत्नी आरती देशमुख यांच्यासह चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत.  

100 कोटींचा आरोप : अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर तर सचिन वाझेला कोर्टाची समज

मुंबई :  Anil Deshmukh's cross-Check : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) पत्नी आरती देशमुख यांच्यासह चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) हेही उपस्थित होते. यावेळी 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी उलट तपासणी सुरु करण्यात आली. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण कर्तव्यावर नसताना सरकारी वाहनाचा वापर केला. न्यायालयीन कोठडीत असताना अधिकाऱ्यांना भेटल्याप्रकरणी चौकाशी होणार आहे.

परमबीर सिंह - सचिन वाझे भेटीने वाद 

दरम्यान सचिन वाझेही चांदिवाल आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी हजर आहेत. काल परमबीर सिंह आणि सचिन वाझे याची भेट झाल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याचीही चौकसी सुरु आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची 10 मिनिटे भेट झाली. चांदीवाल आयोग सुनावणीनंतर ही भेट झाली. चांदीवाला आयोगच्या बाजूच्या खोलीत भेट झाली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांच्या तुरंगातील सुरक्षा रक्षकांना न्यायल्याने समज दिली. कोर्टरूमच्याबाहेर जे घडेल त्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांची असणार आहे. काल वाझे आणि परमबीर सिंह यांची कोर्ट आवारात बंद खोली आड भेट झाली होती.

सचिन वाझे याला न्यायालयाने फटकारले

दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावतीने पुढील तारीख मागण्यात आली होती. मात्र अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलाने सोबत बोलणे झाले नसल्याने आजच सुनावणी घ्यावी ही विनंती केली होती. यावर आजच एक तासानंतर सुनावणी घेण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत सचिन वाझे याने बोलण्याचा प्रयत्न केला यावर न्यायल्याने त्यांना थांबवले. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये, असे सुनावले यावेळी सुनावले.

Read More