Marathi News> मुंबई
Advertisement

धावत्या लोकलमधून लहान मुलगा पडला खाली

धावत्या गाडीत चढणं जीवावर बेतू शकतं हे दाखवणारा व्हिडिओ

धावत्या लोकलमधून लहान मुलगा पडला खाली

मुंबई : धावत्या गाडीत चढणं जीवावर बेतू शकतं हे दाखवणारा व्हिडिओ

आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे सीसीटीव्ही दृश्य मुंबई पश्चिम रेल्वेवरच्या नायगाव रेल्वे स्थानकातलं आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला एक महिला आपल्या 7 वर्षांच्या मुलाला घेऊन, नायगावच्या फलाट क्रमांक दोनवर आलेल्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. आगोदर तिने मुलाला चालत्या लोकलमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला.

मात्र मुलगा खाली पडला. त्याचवेळी ट्रेननं वेग घेतल्यानं मुलगा नेमका लोकल आणि फलाटामध्ये सापडला. तिथे सेवेवर तैनात असलेले रेल्वे कर्मचारी सुनिलकुमार यांनी क्षणाचाही विलंब न लावता धावत जावून मुलाला खेचून घेत त्याचा जीव वाचवला. यात सुनिलकुमार यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे जीव मोलाचा आहे हे जाणा आणि नसती घाई करु नका असं कळकळीचं आवाहन, झी 24 तास आपल्या तमाम प्रेक्षकांना करत आहे. 

Read More