Marathi News> मुंबई
Advertisement

'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक

Republic Day 2024 : शिवराज्याभिषेकच्या 350 व्या महोत्सवानिमित्त 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभगी होणार आहे. 

'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक

Republic Day 2024 : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ ( Maharashtra Chitrarath) यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे.  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Shdhir Mungantiwar) यांच्या संकल्पनेतून 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान - छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त हौणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही याच संकल्पनेवर आधारीत आहे.

 यंदाच्या प्रजासत्ताक दिनी (74th Rpublic Day) नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविलं होतं. या पार्श्वभमीवर विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून "लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते. 

 शिवाजी महाराजांचे कार्य आजही  सर्वांना प्रेरणादायी आहे. महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. नवी दिल्ली इथं साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग या रथावर दर्शविण्यात आलेले आहेत.

या चित्ररथाची बांधणी राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात करण्यात येत आहे. शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे.  तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकार चमूच्या  माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

देशभरातून यावेळी 30 राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावा केला होता, पण विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि पदेशातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भारताच्या विविध राज्यांची संस्कृती आणि वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ सादर केले जातात.

Read More