Marathi News> मुंबई
Advertisement

लसीकरणात राज्याचा विक्रमी उच्चांक; आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने उच्चांकी कामगिरीची नोंद केली आहे. ( vaccination in Maharashtra)  

लसीकरणात राज्याचा विक्रमी उच्चांक; आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना लस

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. ( vaccination in Maharashtra) आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. (Record high in vaccination in Maharashtra)

दरम्यान, राज्यात आज 9,812 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 8,752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,81,551 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात  एकूण 1,21,251 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  95.93 टक्के झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. काल राज्याने 3 कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात 7 लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Read More