Marathi News> मुंबई
Advertisement

रश्मी शुक्ला यांनी रडून आणि पाय पडून माफी मागितली; आव्हाडांचा घणाघात

वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या बदलींचे प्रकरण बनावट आहेत. शिरोळच्या आमदाराचे ट्विट मी यासाठी केले की, रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत होत्या. असे आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.

रश्मी शुक्ला यांनी रडून आणि पाय पडून माफी मागितली; आव्हाडांचा घणाघात

मुंबई : वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या बदलींचे प्रकरण बनावट आहेत. शिरोळच्या आमदाराचे ट्विट मी यासाठी केले की, रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत होत्या. असे आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.

 
जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटले पत्रकार परिषदेत : -

 

  • रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग हे गोपनियतेच्या कायद्याचे उल्लंघन आहे. कालच्या कॅबिनेट बैठकीत याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या
  • फोन टॅप करण्यासाठी खोटे कारणं देण्यात आले, फोन टॅप करण्यासाठी केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन
  • ऑफिशिअल सिक्रेट अँक्टनुसार शुक्ला यांनी केलेले टॅपिंग केलेले हे गुन्हे आहेत.
  • याआधीदेखील आमच्या सरकारने हा कटाचा भाग असू शकतो म्हणून  त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांनी पाय पडून माफी मागितली होती. 
  • सरकारच्या मधल्या मंत्र्यांनी तीला माणूसकीच्या नाते माफ केलं. परंतू हा एवढा मोठा कटाचा भाग आहे. हे नंतर कळलं.
  • आमचं सरकार काही अधिकाऱ्यांना ओळखायला कमी पडलं. हे कबूल करावं लागेल.
     
Read More