Marathi News> मुंबई
Advertisement

राजभवनात सीआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

राजभवन सीआरपीएफ स्टाफ क्वार्टर्समध्ये एका सीआरपीएफच्या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

राजभवनात सीआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : राजभवन सीआरपीएफ स्टाफ क्वार्टर्समध्ये एका सीआरपीएफच्या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिवॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाआहे. दत्तात्रय चव्हाण यांना जखमी अवस्थेत एलिझाबेथ रूग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर पुढील उपचारांसाठी बॉम्बे रूग्णालयात नेण्यात आलं.

दत्तात्रय चव्हाण यांच्यावर उपचार सुरू आहेत. दत्तात्रय हेऔरंगाबादचा राहणारे आहेत. दत्तात्रय चव्हाण यांच्याजवळ एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे.

दत्तात्रय यांनी घरातील वादाच्या कारणावरून, कंटाळून असं कृत्य करण्याचा निर्णय घेतला असल्याचं चिठ्ठीत म्हटलं आहे. मलबार पोलीस ठाण्यात याबाबतीत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Read More