Marathi News> मुंबई
Advertisement

राज्यातील सद्य स्थितीनंतर राज ठाकरेंचा हा व्हिडिओ व्हायरल

राज्यात गेले दोन दिवसात जे काही घडत आहेत. त्यावरुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

राज्यातील सद्य स्थितीनंतर राज ठाकरेंचा हा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राज्यात गेले दोन दिवसात जे काही घडत आहेत. त्यावरुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

राज ठाकरेंचा इशारा

निवडणूक आल्या की तुम्हाला गृहित धरले जाईल. यांच्याकडे एक शस्त्र आहे. हे शस्त्र उपसलं की तुम्ही भांडायला तयार व्हाय. ते शस्त्र आहे जातीचं. जाती-पातीमध्ये तुम्हाला डुबवून ठेवतील. आरक्षणाच्या नावाखाली तुम्हाला भिडवून ठेवतील. तुमच्यामध्ये वाद निर्माण करतील. 

डोकी फोडायला लावतील

तुम्हाला तुमची डोकी फोडायला लावतील. निवडणुकीच्यातोंडावर जातीवरुन तुमच्याकडे मते मागतील आणि तुम्ही हे सगळे विसरुन भोळेपणाने तुम्ही जातीच्या नावाने मतदान करुन मोकळे व्हाल. पुन्हा पाच वर्षे आपण पश्चाताप करत राहू. हे कधीपर्यंत सहन करणार?

Read More