Marathi News> मुंबई
Advertisement

...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

आपल्या खळखट्याक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी त्यांचा विरोध उत्तर भारतीयांना नाहीतर सिनेमागृहांमध्ये सिनेमे दाखवण्यावरून आहे.

...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : आपल्या खळखट्याक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी त्यांचा विरोध उत्तर भारतीयांना नाहीतर सिनेमागृहांमध्ये सिनेमे दाखवण्यावरून आहे.

सिनेमागृहांना राज ठाकरेंचं ‘प्रेम’पत्र

मनसेने मराठी सिनेमांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धाव घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिनेमागृहांच्या मालकांना एक पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी लिहिले की, जर मराठी सिनेमाला ‘देवा’ प्राईम टाईममध्ये दाखवला गेला नाही तर ते सलमान खानचा येणारा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा कोणत्याही सिनेमागृहात लागू देणार नाही. 

काय आहे प्रकरण?

ठाकरे यांच्यानुसार, ‘सलमान खानच्या टायगर जिंदा है सिनेमामुळे ‘देवा’ या मराठी सिनेमाला स्क्रिन मिळत नाहीये. अशात जर महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना स्क्रिन मिळत नसेल तर आम्ही इथे कोणताही हिंदी सिनेमा लागू देणार नाही’.

मराठी सिनेमा ‘देवा’ या महिन्यात २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. आणि याच दिवशी सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायरग जिंदा है’ सिनेमा रिलीज होणार आहे. ठाकरेंच्या पत्रानंतर सिनेमागृहांच्या मालकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचं अनेकांनी अ‍ॅडव्हांस बुकिंगही केलं आहे त्यामुळे त्यांना तसाही फट्का बसू शकतो.

Read More