Marathi News> मुंबई
Advertisement

मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंचा 3 मेपर्यंत अल्टीमेटम, अन्यथा...

राज ठाकरे यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी त्यांनी शेवटचा इशारा दिला आहे.

मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंचा 3 मेपर्यंत अल्टीमेटम, अन्यथा...

ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंगे (Loudspeeker) 3 मेपर्यंत काढण्यासाठी राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व मौलवींना बोलवून मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बोलताना, पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. 'मनसे आपली भूमिका बदलणार नाही. आम्हाला कोणतंही तेढ निर्माण करायचं आहे. हा धार्मिक नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचं', देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. मनसेने देखील या सभेला उत्तर सभा असे नाव दिले होते. मशिदीवरील भोंगे ईदपर्यंत म्हणजेच 3 मे पर्यंत काढण्याचा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे.

Read More