Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट

Raj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट

Salman Khan house fired shots : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनेता सलमान खान यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. आज सकाळीच सलमान खानच्या (Salman Khan firing incident) घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचं समजतंय. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातील एकाचे नाव समोर आलं असून गुंड विशाल उर्फ कालू आहे. तो रोहित गोदारा साठी काम करतो अशी सूत्रांनी माहिती दिलीय. रोहित गोदारा हा राजस्थान मधील गुंड असून तो बिश्नोइ गॅंग राजस्थान येथे चालवतो.

नेमकं काय झालं?

सलमान खान मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. येथे 2 अज्ञातांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 राऊंड फायरिंग केले होते. दोन आरोपी सलमानच्या घरावर फायरिंग करून लगेच निघून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसले. तीन गोळ्या सुरक्षा भिंतीला लागल्या तर एक गोळी गार्डनमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे.  सलमानच्या घराजवळीस सीसीटीव्ही तपासले जात आहेत. 2 अज्ञात हेल्मेट घालून दुचाकीवर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ दाखल झाले होते. दरम्यान क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली अन् पुढील तपास सुरू केला आहे.

बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली

दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून आला तर युद्ध योग्य आहे. सलमान खान आम्ही तुला फक्त ट्रेलर दाखवलाय, कारण तुला आता समजेल की आमची ताकद काय आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नको. आम्ही तुला पहिला आणि अखेरची वॉर्निंग देतोय. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील ज्यांना तुम्ही देव मानता त्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत, असं म्हणत बिश्नोई गँगने सलमानला धमकी दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात...

अतिशय दुर्दैव आहे, अपकी बार गोळीबार सरकार अशी परिस्थिती झालेली आहे. सातत्याने या राज्यात गोळीबार होतो कसा? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सलमान खान यांच्या घराच्या बाहेर हा गोळीबार झाला, पण त्यावेळेस त्या घराबाहेरून मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, दूध वाला, भाजीवाला यांची जबाबदारी कोण घेणार? असंही सुळे विचारतात. मुंबईमध्ये गोळीबार, पुण्यामध्ये कोयता गॅंग, ऐसा कैसे चलेगा.. क्राईम महाराष्ट्रात वाढलेला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Read More