Marathi News> मुंबई
Advertisement

Raj Thackeray Live: राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवणार सिनेमा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे याने मुलाखत घेतली. झी स्टुडिओच्या हर हर महादेव या सिनेमाच्या निमित्ताने ही मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सिनेमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे.

Raj Thackeray Live: राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवणार सिनेमा

मुंबई : 'हर हर महादेव' सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे (Actor Subodh Bhave) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. राज ठाकरे यांनी यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा केला. राज ठाकरे यांनी हरहर महादेव सिनेमात डबिंगसाठी तब्बल 17 दिवस काम केलं आहे. यावेळी त्यांनी सिनेमा बनवणार असल्याचं देखील म्हटलं आहे. (Raj Thackeray Interview with Subodh Bhave)

राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले की, 'फिल्म मेकिंग हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. मी वेगवेगळ्या अंगाने चित्रपट पाहतो. माझी पत्नी माझ्यावर चिडते. किती वेळा मी सिनेमे पाहतो. सिनेमांची मला आवड आहे. चित्रपटात खूप लोकांची मेहनत असते. त्यात वॉईस ओव्हर एक भाग आहे. त्या उत्सूकतेने मी ही गोष्टी केली. चित्रपटापेक्षा खोलातील गोष्ट म्हणजे शिवछत्रपती आहेत. त्यामुळे मी हो म्हटलं आहे.'

'1974 शिवाजी पार्कमध्ये शिवसृष्टी बाबासाहेब पुरेंदर यांनी आणली होती. त्यात बाळासाहेबांचं देखील मोठं योगदान होतं. तेव्हा मी दुसरीला होतो. तेव्हा मी बाळासाहेबांसोबत जात होतो. संध्याकाळी 7 ला राज्याभिषेक सोहळा होत होतो. तो मी रोज पाहत होतो. तो सोहळा माझा तोंड पाठ झाला होता.'

'कॉलेजला असताना मी प्लाझा सिनेमाला 2 वेळा यायचो. गांधी सिनेमा मी असा 30-32 वेळा पाहिला. तेव्हा मी विचार करत होतो की असा सिनेमा छत्रपतींवर आला पाहिजे. त्यानंतर मी अनेक पुस्तके वाचली. सगळं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर माझा लक्षात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमाच होऊ शकत नाही. 4-5 प्रसंगाशिवाय शिवाजी महाराजांबाबत अनेक गोष्टी आहेत. त्याचं विषयावर सिनेमे केले तर आपण शिवरायांवर अन्याय करतोय असं वाटलं.'

'आता सगळेच प्लॅटफॉर्म बदलले आहेत. माझं त्यावर काम सुरु आहे. 2 ते 3 पार्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणण्याचा माझा विचार सुरु आहे.' असं देखील राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

Read More