Marathi News> मुंबई
Advertisement

औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याचे संकेत

'औरंगाबादेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होण्यास कोणतीही अडचण आहे असं मला वाटत नाही'', येत्या २ ते ३ दिवसात औरंगाबादचे आयुक्त याविषयावर निर्णय घेतील, 

औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याचे संकेत

मुंबई : 'औरंगाबादेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होण्यास कोणतीही अडचण आहे असं मला वाटत नाही'', येत्या २ ते ३ दिवसात औरंगाबादचे आयुक्त याविषयावर निर्णय घेतील, पण या माध्यमातून राज्यातील शांतीचा भंग होणार नाही, याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री माझ्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, गृहखात्याचा मी मंत्री असल्याने माझे निर्णय मीच घेतो, भोंगे हा महाराष्ट्रासाठी आणि आताच आलेला प्रश्न नाही. यात त्यातच कुणी म्हणतं भोंगे काढा, अमकं तमक करा. तेव्हा वातावरण दुषित करण्यासाठी हे चाललंय. हनुमान चालिसा वाचण्याला आमचा कोणताही विरोध नाही.

भोंग्या संबंधात सर्वपक्षीय बैठक घेतली. याविषयातला निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय उपस्थिती आवश्यक आहे. कारण राज्यातील वेगवेगळ्या भागात काही ना काही कार्यक्रम सुरु असतात. यात कीर्तन आलं,काही भोंगा लावून करण्यात आलेला कायदा आला.

Read More