Marathi News> मुंबई
Advertisement

देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट होणार आहे.

देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : भाजपनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट होणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता दोघांची भेट होणार आहे. 

दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ही भेट रद्द झाली होती. नवीन सत्ता स्थापनेनंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटू असं फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं. 

त्यानंतर आज सकाळी वाजता या दोघांची भेट होणार आहे...पण, या दोघांच्या भेटीत दडलंय काय...? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Read More