Marathi News> मुंबई
Advertisement

राज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला

 महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.  

राज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला

मुंबई : नवरात्रीनिमित्ताने आजपासून मुंबई आणि एमएमआर भागातल्या महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही. त्यामुळे आजचा मुहूर्त हुकला. ह मुहूर्त हुकण्याला रेल्वेचा खोडा असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवसांत निर्णय घेणार आहोत, असे पश्चिम रेल्वेने 'झी २४ तास'ला माहिती दिली.

रेल्वेने मात्र सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शवली. केंद्राची परवानगी आणि तयारी करण्यासाठी वेळ लागेल असे सांगत लोकल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले. त्यामुळे नवरात्री निमित्तानं राज्य सरकारनं महिलांना दिलेल्या या विशेष भेटीवर विरजण पडले आहे.
 
दरम्यान, रेल्वेच्या याबाबत महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रवासासाठी मोर्चे काढू तसेच रस्त्यावर उतरु, असा इशारा महिला प्रवाशांनी दिला आहे. बस आणि रिक्षाने प्रवासात अधिक पैसे मोजावे लागतात असे महिलांनी सांगितले आहे. तर या बाबत केंद्राने देखील लवकरात लवकर सर्वसामान्य महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरु करावा, अशी मागणी केली आहे.

Read More