Marathi News> मुंबई
Advertisement

मुलुंडमध्ये भाजपच्या ऑफिसबाहेर राडा, पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोप

Mulund Rada :  मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. 

मुलुंडमध्ये भाजपच्या ऑफिसबाहेर राडा, पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोप

Mulund Rada : मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचे आणि मोजण्याचे काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. 

त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेतली असून सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आला. 

आता घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक दाखल झाले आहे. पुढील तपास कार्य सुरू आहे. 

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिलिंद कोटेजा यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेचा आढावा घेतला. पोलिसांकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सूचना दिल्या. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रसाद लाड हेदेखील उपस्थित होते.

मिलिंद कोटेजांना जनतेचे समर्थन मिळतंय. त्यामुळे ठाकरे गटाच्या मनामध्ये भीती निर्माण झाले आहे. त्यामुळे असे खोटे आरोप केल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली. अशाप्रकारे कार्यकर्त्यावर आरोप होतो तेव्हा कार्यकर्त्याचे मनोबल वाढवण्यासाठी, त्याला साथ देण्यासाठी उपमुख्यमंत्री आल्याचे ते म्हणाले. यावेळी एका महिलेवर हल्ला करण्यात आलाय. आरोपींवर गुन्हा दाखल होईल, असेही ते म्हणाले. 

 

 

Read More