Marathi News> मुंबई
Advertisement

परमबीर सिंग यांच्या पत्रावर प्रश्नचिन्ह, दोघांचे कबुली जबाब 'झी 24 तास'च्या हाती

पत्रात उल्लेख असलेल्या दोघांचे कबुली जबाब झी 24 तासच्या हाती

परमबीर सिंग यांच्या पत्रावर प्रश्नचिन्ह, दोघांचे कबुली जबाब 'झी 24 तास'च्या हाती

मुंबई : परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचा कबुली जबाब झी 24 तासच्या हाती आलाय. पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबामुळे परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

पत्रात उल्लेख असलेले संजय पाटील यांच्या चॅटचा मजकूर आणि प्रत्यक्ष दिलेल्या जबाबात तफावत असल्याचे आढळले. मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येक ३ लाख रुपये जमा करण्यास गृहमंत्र्यांनी वाझेला सांगितल्याच चॅटमध्ये उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष जबाबात गृहमंत्र्यांनी स्वतःहून वाझेंना त्याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख आहे. 

वाझेने आपल्याला सांगितले की, मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्यक्ष ३ लाख रुपये जमा होत असल्याची माहिती आपल्याला मिळाल्याची विचारणा गृहमंत्र्यांनी वाझेकडे केली असा जबाबात उल्लेख आहे. 

म्हणजे गृहमंत्र्यांनी वाझेला पैसे जमा करण्यास सांगितले नव्हते. तर गृहमंत्र्यांनीच असा प्रकार मुंबईत सुरू आहे का ? अशी वाझेकडे विचारणा केल्याचे पाटील यांच्या जबाबात उघड झाले आहे. 

भुजबळ आणि पाटील ४ मार्च २०२१ रोजी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वर बंगल्यावर त्यांना भेटले असल्याचा परमबीर सिंग यांच्या पत्रात उल्लेख आहे. 
मात्र या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचा या दोन्ही अधिकार्‍यांच्या जबाबात म्हटले. 

४ मार्च रोजी आपण अधिवेशनाच्या ब्रिफींगसाठी गृहमंत्र्यांना ज्ञानेश्वरीवर भेटलो. तेव्हा संजय पाटील तिथे नव्हते. मी बाहेर पडताना दारात मला संजय पाटील भेटल्याचा भुजबळ यांच्या जबाबात म्हटलंय. 

Read More