Marathi News> मुंबई
Advertisement

प्रवाशांना विमानतळांवरच क्वारंटाईन करा, सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे महाराष्ट्रात अधिक सतर्कता बाळगली जाते आहे. 

प्रवाशांना विमानतळांवरच क्वारंटाईन करा, सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे महाराष्ट्रात अधिक सतर्कता बाळगली जाते आहे. मात्र तरी देखील परदेशातून अन्य राज्यात उतरून त्याठिकाणाहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. 

यासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले आहे.

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले.

Read More