Marathi News> मुंबई
Advertisement

मराठा आरक्षण स्थगितीविरोधात मुंबईत आज ठिकठिकाणी आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती मोर्चाचा एल्गार

मराठा आरक्षण स्थगितीविरोधात मुंबईत आज ठिकठिकाणी आंदोलन

मुंबई : मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षण स्थगितीविरोधात मुंबईत आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत 20 ते 25 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलनावेळी कायदा सुवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी आंदोलनस्थळी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती मोर्चाने एल्गार पुकारला आहे. स्थगितीप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून दादर, भांडुप, वांद्रे, विले पार्ले, गिरगाव, लालबाग, जोगेश्वरी, कुर्ला, घाटकोपर, पवईमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

सुशांतसिंग अभिनेता होता त्याच्यासाठी इतके लोक एकत्र येतात, इतक्या कमिटी बसतात आणि आम्ही एवढे आंदोलन केले, अनेकांनी जीव दिले तरी दोन्ही सरकारला जाग नाही. पहाटे पहाटे शपथविधी होतो ते त्यांच्या मनासारखं करतात आणि आम्हाला फुसके आश्वासन मिळतात, अशी टीका मराठा आंदोलकांनी सरकारवर केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हे आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

Read More