Marathi News> मुंबई
Advertisement

ST Strike : आंदोलनकर्त्यांनी मद्यप्राशन केलं होतं! FIR कॉपीत अनेक धक्कादायक खुलासे समोर

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणातील FIR कॉपीत धक्कादायक खुलासे

ST Strike : आंदोलनकर्त्यांनी मद्यप्राशन केलं होतं! FIR कॉपीत अनेक धक्कादायक खुलासे समोर

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून आंदोलन केलं होतं. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे.

या FIR ची कॉपी झी 24 तासच्या हाती लागली आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आंदोलकांनी मद्यप्राशन केल्याचं FIR मध्ये नमुद करण्यात आलं आहे. 

7 एप्रिलला अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांच्याकडून चिथावणीखोर भाषण करण्यात आलं होतं, पवारांच्या निवासस्थानी घुसून जाब विचारणार असं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं होतं. सदावर्तेंच्या चितावणीनंतरच घरावर हल्ला करण्यात आल्याचा उल्लेख FIR कॉपीत उल्लेख आहेत. 

सदावर्ते यांच्या भाषणाच्या काही क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यांच्या भाषणात अशी अनेक चिथावणीखोर वक्तव्य आहेत. आपल्या भाषणात सदावर्ते वारंवार शरद पवार यांचा उल्लेख करत होते. 

न्यायालयाचा निर्णय आला त्या दिवशी संपकरी एसटी कामगारांकडून जल्लोष करण्यात आला होत्या त्या दिवशीही सदावर्ते यांनी बारा तारखेला बारा वाजता बारामतीत जाणार तसंच शरद पवार यांच्या घरात घुसून जाब विचारणार अशी चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केली होती. 

याचा चिथावणीखोर वक्तव्यांमुळे एसटी कामगारांची माथी भडकावण्याच आरोप सदावर्ते यांच्यावर आहे. 

Read More