Marathi News> मुंबई
Advertisement

राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता, शिवतीर्थावर हलचालींना वेग!

Loudspeaker Controversy and Hanuman Chalisa : भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता लागली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक होणार आहे.  

राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता, शिवतीर्थावर हलचालींना वेग!

मुंबई : Loudspeaker Controversy and Hanuman Chalisa : भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता लागली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक होत आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असल्याने या बैठकीकडे लक्ष लागले आहे. हनुमान चालिसा लावण्यावरुन (Hanuman Chalisa Row) राज काय आदेश देणार, याचीही उत्सुकता आहे.

राज ठाकरे यांच्यावर आव्हाडांनी टीका केली आहे. पवारांनी कधी जातियावाद मानला नाही. कधीतरी चैत्यभूमीवर जा असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेने पोलीस अटींचे उल्लंघन झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर राज ठाकरे कोणती नवी घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

मशिदीवरील भोंगे (Loudspeaker Controversy) आणि हनुमान चालिसासंदर्भात राज ठाकरे आज नवी घोषणा करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे नवीन निवासस्थान शिवतीर्थ येथे राज ठाकरे आणि निवडक मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे आज शिवतीर्थावरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. 

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद निर्माण झाला असताना आता मनसे एक पाऊल मागे घेत रमजान ईद निमित्त आजच्या महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला. स्वतः राज ठाकरे यांनी ट्वीट करुन असे करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना आदेश दिले. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी माझ्या ट्वीटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असे राज यांनी म्हटले आहे. त्यानंतर आज ही बैठक होत आहे.

Read More