Marathi News> मुंबई
Advertisement

Kirit Somaiya : मुंबई पोलिसांची किरीट सोमय्यांची घरी धडक, चौकशीला हजर राहण्याचं समन्स

किरीट सोमय्या नॉट रिचेबल,  मुंबई पोलिसांनी घेतली कार्यालयाची झाडाझडती

Kirit Somaiya : मुंबई पोलिसांची किरीट सोमय्यांची घरी धडक, चौकशीला हजर राहण्याचं समन्स

मुंबई : सेव्ह विक्रांत (INS Vikrant) कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या हे सध्या नॉट रिचेबल आहेत.

सोमय्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आलीय.  या पथकांनी किरीट सोमय्यांचा कसून शोध सुरू केलाय. किरीट सोमय्यांचं कार्यालय, निकटवर्तीय आणि इतर ठिकाणी पथकं भेटी देत आहेत. 

आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट सोमय्या यांच्या घरापर्यंत पोहचली असून तिथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तसंच त्यांच्या घराखाली असलेल्या त्यांच्या कार्यालयात जाऊन आर्थिक गुन्हे शाखेने काही कागदपत्रही तपासली. 

मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना समन्स बजावलं असून उद्या चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांच्या घरी कोणी नसल्याने पोलिसांनी सोमय्या यांच्या घराच्या दरवाज्यावर नोटीस चिटकवली आहे. 

किरीट आणि नील सोमय्या या दोघांच्या घराबाहेर नोटीस चिटकवण्यात आली असून दोघांनाही उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. 

Read More