Marathi News> मुंबई
Advertisement

हवालदाराकडून पोलीस अधिकाऱ्याच्या १५ वर्षांच्या मुलाचा विनयभंग

१५ वर्षीय मुलाच्या विनयभंग प्रकरणी, ५० वर्षाच्या कॉन्स्टेबलला अटक कऱण्यात आली आहे.

हवालदाराकडून पोलीस अधिकाऱ्याच्या १५ वर्षांच्या मुलाचा विनयभंग

मुंबई : एका पोलीस अधिकाऱ्याच्या १५ वर्षीय मुलाच्या विनयभंग प्रकरणी, ५० वर्षाच्या कॉन्स्टेबलला अटक कऱण्यात आली आहे. हवालदार ठोंबरे यांनी त्याला निरोप पाठवून घरी बोलावून घेतले, आपण तुला पुढील शिक्षणाविषयी मार्गदर्शन करू असं सांगत त्याला, तुला पुढे काय शिक्षण घ्यावयाचे आहे, असं विचारले, यावर या मुलाने आपल्याला नेव्हीत जायचे आहे असे सांगितल्यावर आपण तुला मार्गदर्शन करू असं सांगत कपडे काढण्यास सांगितले, यानंतर त्याला नको त्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरूवात केली. यानंतर हा मुलगा घाबरला आणि दरवाजा नीट लावलेला नाही, हे पाहून त्याने तेथून पळ काढला.

असे आहेत आरोप

३१ मार्च रोजी ही घटना घडली. ही घ़डलेली घटना लगेच या मुलाने आपल्या आईला सांगितली, यानंतर या मुलाच्या वडिलांनी मुलूंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. ठाण्यात या मुलाचे वडील पोलीस खात्यात सहाय्यक निरीक्षक आहेत. तर आरोपी हवालदार ठोंबरे हे काळबादेवीला ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहेत.

कॉन्स्टेबल ठोंबरे यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोंबरे यांना कोर्टाने २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read More