Marathi News> मुंबई
Advertisement

पीएमसी बँक गैरव्यवहार : राकेश - सारंग वाधवान, वरियम पुन्हा किल्ला न्यायालयात

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत आहे. 

पीएमसी बँक गैरव्यवहार : राकेश - सारंग वाधवान, वरियम पुन्हा किल्ला न्यायालयात

मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत आहे. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि वरियम सिंह यांची पोलीस कोठडी संपतेय त्यामुळे या तिघांनाही किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी पीएमसी खातेधारक न्यायालयाबाहेर जोरदार निदर्शन करणार असल्याचं समजत आहे. 

'ये कौनसे अच्छे दिन'

पीएमसी बँक अपहार प्रकरणाला वसईत नवे वळण आले आहे कारण वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारचा सुट्टीचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले. आमच्या हक्काच्या पैस्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याने त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला वोट देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यांपासून पैशांसाठी सुरू असलेली फरफट व्यक्त करून सरकारला 'ये कौनसे अच्छे दिन' असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

Read More