Marathi News> मुंबई
Advertisement

पीएमसी बँक शेअर होल्डर्स - प्रशासक बैठकीत खातेदार संतप्त

 पीएमसी बँकेचे शेअर होल्डर्स खातेदार आणि पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासकाची बैठक झाली. 

पीएमसी बँक शेअर होल्डर्स - प्रशासक बैठकीत खातेदार संतप्त

मुंबई : भांडुपमधील पीएमसी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात पीएमसी बँकेचे शेअर होल्डर्स, खातेदार आणि पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासकाची बैठक झाली. याबैठकीत सध्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी लागणारे पुरावे पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासनाकडून वकिलांना कधी दिले जाणार, असा सवाल यावेळी खातेधारकांनी केला. 

दरम्यान, याचिकेसाठी लागणारे पुरावे वकिलांना कधी देणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कुठलेही कागदपत्र आपण वकिलांना देऊ शकत नाही, असे प्रशासकांनाकडून खाते शेअर होल्डर्स खातेदारांना सांगण्यात आले. त्यामुळे खातेदार यांचा संताप अनावर झाला.  

एका आठवड्यात ऑडिट रिपोर्ट सादर केला जाईल अशी माहिती प्रशासकांनी खातेधारकांना दिली होती. परंतु पीएमसी प्रकरणाला दोन आठवडे उलटून गेले तरीही अद्यापही ऑडिट रिपोर्ट न आल्यामुळे खातेधारकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Read More