Marathi News> मुंबई
Advertisement

पीएमसी बॅंक घोटाळा : सुरजितसिंग आणि जॉयला इतक्या दिवसांची कोठडी

 जॉय थॉमसला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर सुरजितसिंगला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पीएमसी बॅंक घोटाळा : सुरजितसिंग आणि जॉयला इतक्या दिवसांची कोठडी

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी सुरजितसिंग आरोरा आणि जॉय थॉमसला आज कोर्टात हजर करण्यात आले. आज जॉय थॉमसला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर सुरजितसिंगला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

याप्रकरणी दररोज नवी माहिती बाहेर येत असल्याने पोलिसांना जॉय थॉमसच्या कोठडीत आणखी वाढ हवी होती. आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय दिला आहे. आता जॉय थॉमसच्या जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

तर सुरजितसिंग आरोराला कालच अटक करण्यात आली. पोलिसांकडून १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली गेली. याप्रकरणात प्रथम दर्शनी सुरजितसिंगचा सहभाग दिसत आहे. तीन वेळा तो लोन समितीवर होता. त्याची अधिक चौकशी अजून बाकी असल्याचे कोर्टात सांगण्यात आले. यावर सुरजितसिंग च्या वकिलांनी आक्षेप घेतला. 

गुन्हा दाखल झाल्यापासून कोणतीही समन्स पोलिसांकडून पाठवण्यात आले नाहीत एकही लोन सुरजितसिंगने मंजूर केलेले नाही. तसेच कागदपत्र आरबीआयकडे देण्यात आले आहे.  त्यामुळे फक्त ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करावी अशी विनंती कोर्टासमोर सुरजितसिंगच्या वकिलांनी केली आहे. २२ तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे

तिघेही कोठडीतच

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने अटकेत असलेल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीएमसी बँक प्रकरणातील आरोपी राकेशकुमार वाधवान, सारंग वाधवान आणि वरियम सिंग यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

राकेशकुमार आणि सारंग हे पिता-पूत्र आहेत. दरम्यान, पीएमसी बँक प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले आहे.

न्यायमूर्ती रमन्ना यांच्या खंडपीठानं पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाची याचिका स्वीकारली आहे. आयुष्याची कमाई बँक घोटाळ्याच्या गर्तेत अडकल्यानं जवळपास १५ लाख खातेदार हवालदिल झालेत. संपूर्ण सुरक्षा आणि शंभर टक्के विमा देण्याची मागणी याचिकाकर्ता बिनोज मिश्रा यांनी याचिकेतून केली आहे.

विश्वास ठेवा 

बँकेतील ठेवीदारांनी तपास यंत्रणेवर विश्वास ठेवावा. लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांना परत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती डीसीपी श्रीकांत परोपकारी यांनी दिली.

किल्ला कोर्टच्या बाहेर पीएमसी बँकेतील ठेवीदारांचा रोष बघता मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचे उपयुक्त आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील तपासासाठी नेमून दिलेल्या एसआयटीचे प्रमुख श्रीकांत परोपकारी यांना पाचारण करण्यात आलं.

त्यावेळी खातेधारकाना उद्देशून परोपकारी बोलत होते. आज 3 आरोपींना न्यायालयीन कोठडीची मिळाली. त्यामुळे हा रोष आणखी वाढला किला कोर्टाबाहेर या खातेधारकांनी उग्र आंदोलनही केले.

Read More