Marathi News> मुंबई
Advertisement

प्लास्टिक बंदीनंतर सोशल मीडियावर जोक्सचा पूर

प्लास्टीक बंदी आणि जोक्स

प्लास्टिक बंदीनंतर सोशल मीडियावर जोक्सचा पूर

मुंबई : प्लास्टिक बंदीनंतर सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर मोठ्याप्रमाणात जोक्स फिरायला लागले आहेत. ह्या निर्णयावर मिश्किल भाष्य करणारे सामान्यांचे प्रश्न आणि परिणाम काय यावर मजेशीर पद्धतीने लिखाण करत प्लस्टिक बंदीचा उदोउदो सोशल मीडियावर होतांना दिसत आहे . 

- "महिलांना अगोदर तांदळाच्या डब्यातील पैसे तांदळाच्या डब्यातील पैसे बाहेर काढायला लावले आणि आता गादी खालच्या पिशव्या काढायला सांगत आहेत.

हा मेसेज व्हॉट्‌सऍपच्या बहुतांश ग्रुपवर आला आहे. 

- "घरापुढे गाडी लावू नये अन्यथा गाडीला प्लास्टिक पिशवी अडकवली जाईल.'

- "बरे झाले फक्‍त प्लास्टीकवर बंदी घातली. जर काचेवर बंदी घातली असती तर दारूच्या दुकानात तांब्या घेऊन जावे लागले असते.'

-"प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांनाही दंड लागणार का, असा प्रश्‍न काहींनी उपस्थित केला आहे.

- "अवघ्या महाराष्ट्रासमोर एक गहन प्रश्‍न-उद्यापासून चुना पुडी येणार कशात ? 

- "आमच्याकडे प्लास्टिक पिशव्यांना कापडी कव्हर लावून मिळेल - स्थळ अर्थातच पुणे',

- "जर कोणी तुमच्याकडे पाच हजार रुपये दंड मागितला तर त्याला सांगा, मोदी देणार होते त्या 15 लाखातून वळते करून घे.' 

- काहीजण राजीनामे खिशात ठेवून फिरत होते. पावसाळ्यात प्लास्टिक पिशवीत ठेवत असे. यामुळे फडणवीसांनी प्लास्टिक पिशवीवरच बंद घातली. तुमचा राजीनामा भिजणार - त्यामुळे बसा ठणठण करीत.' 

- प्लॅस्टिकचे रेनकोट चालेल ना ? नाहीतर महापालिकेवाले न्यायचे उचलून,'

- राज्यातील ठिकठिकाणी महापालिकेकडून झालेल्या कारवाईच्या पावतीचे फोटो फिरत होते. पहिली विकेट पडली, दुसरीही विकेट पडली, असे सांगत पावतीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल
 
- बरं झालं,प्लास्टिकबरोबर काचेवर बंदी नाही आली ती.. नाहीतर दारूच्या दुकानावर तांब्या घेऊन जायला लागलं असतं... मी पीत नाही, पण मित्रांची काळजी

- नोटबंदी प्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या ही बदलुन मिळाव्यात.

- मला दूध घ्यायचे आहे कागदात बांधून मिळेल का?

Read More