Marathi News> मुंबई
Advertisement

प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शहा यांची गाडी फोडली

भाजपा उमेदवारांची विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर झाल्यानंतर, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील गटबाजी समोर आली आहे.

प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शहा यांची गाडी फोडली

मुंबई : भाजपा उमेदवारांची विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर झाल्यानंतर, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील गटबाजी समोर आली आहे. प्रकाश मेहता यांचं तिकिट कापून पराग शहा यांना तिकिट देण्यात आलं आहे. ही बातमी समजताच प्रकाश शहा आणि पराग शहा यांचे समर्थक समोरासमोर आले आहेत. यावेळी प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शहा यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे प्रकाश मेहता यांनी बंड करण्याचं ठरवलं असल्याचंही सांगण्यात येत आहे. प्रकाश मेहता आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही सांगण्यात येत आहेत. किरिट सोमय्या यांच्याकडून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र प्रकाश मेहता यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

भाजपाने आज चौथी यादी जाहीर केली, आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रकाश मेहता, राज पुरोहित, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांचे तिकिट कापण्यात आले आहे.

Read More