Marathi News> मुंबई
Advertisement

अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची घोषणा नाहीच

२०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही सातव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली नाही.

अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची घोषणा नाहीच

मुंबई : राज्य सरकारकडून या वर्षी सातव्या वेतन आयोगाची घोषणा होईल, अशी शक्यता नोकरदारांना वाटत होती. मात्र या २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही सातव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली नाही.

१२ लाख कर्मचाऱ्यांची निराशा

यामुळे तुर्तास तरी राज्याच्या १२ लाख कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. बक्षी आयोगाच्या अहवालानंतर सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली जाणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. 

तुर्तास सातव्या वेतन आयोगाला ब्रेक

यावर्षी सातव्या वेतन आयोगाची घोषणा होईल असं म्हटलं जात असताना, या वर्षी सातव्या वेतन आयोगाला तुर्तास तरी राज्य सरकारने ब्रेक लावला आहे.

Read More