Marathi News> मुंबई
Advertisement

देवेंद्र फडणवीस संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांची भेट होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे मागचे २ दिवस निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण दौऱ्यावर होते. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळाबाबत भाजपच्या मागण्यांचं निवेदन भाजप मुख्यमंत्र्याना देणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही कोकण दौऱ्यावर होते. कोकण दौऱ्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. 

कोकण दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने दिलेली मदत तोकडी असल्याचं सांगितलं. कोकणासाठी जाहीर केलेलं पॅकेज फायद्याचं नसल्याचं फडणवीस म्हणाले. चक्रीवादळात कोळी बांधवांचं नुकसान झालं, पण त्यांचा या पॅकेजमध्ये उल्लेखही नाही. कोळी बांधवांना बोटींच्या दुरुस्तीसाठी दीड लाख रुपये लागणार आहेत, पण त्यांच्यासाठी सरकारने काहीच दिलं नाही. कोळी बांधवांसाठी किमान १० हजारांची तातडीची मदत दिली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

फडणवीसांच्या मागण्या

- घरांसाठी जाहीर केलेली मदत कमी आहे, ती वाढवून द्यावी

बागांचं नुकसान झाल्यामुळे पुढचं १० वर्ष उत्पन्न बुडणार आहे. सरकारने गुंठ्याला ५०० रुपये मदत दिली आहे. बाग साफ करायलाच मोठा खर्च येणार आहे

- १०० टक्के अनुदानातून फळबाग योजना लागू करा

- पर्यटन व्यवसायासाठी सरकारने कर्जाची हमी घेऊन यांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून द्यावं 

- वीज पुरवठा लवकर सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यातील वीज कर्मचारी आणून काम करण्याची गरज

Read More