Marathi News> मुंबई
Advertisement

लॉजमध्ये वाढदिवस साजरा करुन विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपीला मुंबईतून अटक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एका प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रियकराला साकीनाका येथून अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

लॉजमध्ये वाढदिवस साजरा करुन विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपीला मुंबईतून अटक

Mumbai Crime : नवी मुंबईत एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत महिला ही बॅंक मॅनेजर असल्याची माहिती समोर आली आहे.  तीन महिन्यांच्या ओळखीतच त्यांचे प्रेमसंबध जुळले होते. मात्र प्रेयसीचे अन्य व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय आरोपीला आला होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला लॉजवर नेले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला. मात्र पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपी प्रियकाराला अटक केली.

नवी मुंबईत एका खासगी बँकेच्या 35 वर्षीय मॅनेजरची तिच्या प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या प्रियकराला तिचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, मुंबई पोलिसांनी आरोपी शोएब शेख (24) याला साकी नाका येथील त्याच्या घरातून पहाटे अटक केली. त्यानंतर आरोपीला पोलिसाला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या सगळ्या प्रकारानंतर आरोपी तरुण उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आरोपीने सांगितले की तो सोमवारी त्याची मैत्रिण एमी उर्फ ​​अमित रवींद्र कौर (35) हिच्यासोबत नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. कौरचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा शेखला संशय होता आणि रागाच्या भरात तिने तिचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारो त्यांनी शेखला साकी नाका येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपी सायन परिसरात एका गॅरेजमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

8 जानेवारीला अमितचा वाढदिवस होता. शोएबने वाढदिवासाच्या दिवशीच अमितला मारायाचं असं ठरवलं होतं. ऑफिस संपल्यानंतर अमित शोएबला भेटायला गेली. दोघांनीही वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दोघांनी एका लॉजमध्ये चेक-इन केले. शोएब आणि अमितने त्यांच्या ओळखपत्रांवर लॉजमधील खोली बुक केली. मध्यरात्री लॉजच्या कर्मचाऱ्यांनी शोएब तिथून निघून जात असल्याचे पाहिले. पण त्यांना कसलाही संशय आला नाही. मात्र शोएबने अमितची हत्या केली होती आणि तो त्याच्या घरी पोहोचला होता.

त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास साकीनाका पोलिसांना एका खबऱ्याचा फोन आला. त्याने सांगितले की त्याच्या शेजारच्या एका व्यक्तीने काहीतरी चुकीचे केले आहे. त्यानंतर पोलिसांनी शेखला पकडून पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान शेखनेच त्याची प्रेयसी अमित कौरची हत्या केल्याचे कबुल केले.

Read More