Marathi News> मुंबई
Advertisement

पत्नी आणि सासू करायची जाच; रोजच्या त्रासाला कंटाळून जावयाने उचललं टोकाचं पाऊल

Nashik Sucide:  नाशिकच्या आडगाव परिसरात पत्नी सासू आणि सासरकडच्या मंडळींनी त्रास दिल्याने पतीनेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

पत्नी आणि सासू करायची जाच; रोजच्या त्रासाला कंटाळून जावयाने उचललं टोकाचं पाऊल

Nashik Sucide: आपण सासूने किंवा सासरकडच्याने सुनेला त्रास दिल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. यातून पुढे विवाहितीने आत्महत्या केल्याच्या घटना घडतात. ज्या खूपच दुर्देवी असतात. मात्र नाशिकमध्ये एक वेगळीच घटना समोर आलीय. नाशिकच्या आडगाव परिसरात पत्नी सासू आणि सासरकडच्या मंडळींनी त्रास दिल्याने पतीनेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या पतीला आत्महत्या करण्या इतपत टोकाचं पाऊल उचलावं असं का वाटलं? असं नेमकं काय झालं होतं? सविस्तर जाणून घेऊया.

पत्नी आणि सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.  या घटनेनंतर कोणार्क नगर भाग हादरुन गेला. आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तुषार अंतापुरकर असं आत्महत्या केलेल्या मयताचे नाव आहे. तुषारने आत्महत्या करण्यापुर्वी चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यात मी पत्नीच्या आणि सासरकडच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्याने म्हटलंय.

 2008 मध्ये विवाह

याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... वडील केशव अंतापूरकर यांनी याबाबत फिर्याद आडगाव पोलीस ठाण्यात दिलीये. तुषारचा 2008 मध्ये शीतलसोबत विवाह झाला आहे. पत्नी लग्नानंतर दोन महिन्यांतच घरातून निघून गेली. 

शारीरिक, मानसिक छळ 

गेल्या 15 वर्षांपासून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी आहे. मुलगा तिला घरी येण्यासाठी वारंवार विनंती करत होता. सासरे वसंत चव्हाण, सासू आणि शालक यांनी संगनमत करत शारीरिक, मानसिक छळ करत होते. या छळाला तो कंटाळला होता. 

आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले असून मंगळवारी दुपारी 3 वाजता पंख्याला तारेने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

Read More