Marathi News> मुंबई
Advertisement

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

१५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे. 
 

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याबाबत सांगितलं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे. 

या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारची एक टीम जाईल. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी  'ब्लॅक बेल्ट' म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणं टाळण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शिवाय ऑनलाईन खरेदीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केलं. 

येत्या काळात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येवू नये म्हणून सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. सरकारकडून आवाहन केलं जातं आहे. मात्र तरी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये हळूहळू शिथिलता दिसत आहे. पण ते योग्य नसल्याचं ठाकरे म्हणाले. 

कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. सरकारकडून आवाहन केलं जातं आहे. मात्र तरी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. करोना विरुद्धच्या नव्या मोहिमेत सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. 

Read More