Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांना मिळणार खुशखबर? सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल प्रवास

मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबईकरांना मिळणार खुशखबर? सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल प्रवास

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख कमालीचा घसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बांधितांची संख्या हजाराच्या आत आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगरचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत आला असून  ४.४० टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या अनलॉकच्या निकषानुसार मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Local for All)

अनलॉकचे पाच टप्पे ठरवण्यात आले असून पहिल्या टप्प्यात येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्ह्यात काही निर्बंध शिथिल करण्याची सूट देण्यात आली आहे. आता मुंबई अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आल्यानं निर्बंध आणखी कमी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना प्रतिक्षा असलेल्या लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे लोकलसेवेबद्दल काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलं आहे.

राज्य सरकारने उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्ही रेट असे निकष ठरवले आहेत. पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यात काही ठिकाणीच निर्बंध ठेवण्याची सूचना आहे. प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध बेडच्या संख्येनुसार स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे.

या आठवड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, त्यात मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत आला आहे.

Read More