Marathi News> मुंबई
Advertisement

धक्कादायक! मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर

Mumbai University Answer Sheet: निकाल दिरंगाई, उत्तर पत्रिका गहाळ ,नुकतेच व्हाट्सअप वर प्रश्न पत्रिका लीक नंतर विद्यापीठाचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे.

धक्कादायक! मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर

Mumbai University Answer Sheet: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्स साठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे.  मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग अत्यंत गोपनीय समजला जातो मात्र याच विभागातील उत्तर पत्रिका बाहेर कशा ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

निकाल दिरंगाई, उत्तर पत्रिका गहाळ ,नुकतेच व्हाट्सअप वर प्रश्न पत्रिका लीक नंतर विद्यापीठाचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागात फक्त प्राध्यापक जाऊ शकतात. त्या गोपनीय विभागात शिपाई जाऊन उत्तर पत्रिका बाहेरच घेऊन कशा येतात ? असा प्रश्न विचारला जातोय. उत्तर पत्रिका अशा पद्धतीने बाहेर आल्यामुळे उत्तर पत्रिका सोबत छेडछाड  होऊ शकते किंवा गैरवापर होऊ शकते, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. यापूर्वीही विद्यापीठातील उत्तर पत्रिका गहाळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहेत.

कुलगुरू प्र कुलगुरू यांनी लक्ष देऊन हा गैरप्रकार थांबत आयडॉलच्या परीक्षा विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे.

Read More