Marathi News> मुंबई
Advertisement

शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला शुभेच्छा दिल्याचा खोचक उत्तर दिलंय.

शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडून गेलेल्यांवर कठोर शब्दात टीका केलीय. पक्ष संपवण्याचा विडा उचलणाऱ्यांनी विडा खाऊन पिचकाऱ्या मारून मोकळे झालेत. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणे आणि भुजबळांना टोला हाणलाय. राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला शुभेच्छा दिल्याचा खोचक उत्तर दिलंय. तर तुरुंगातून परतल्यावर भुजबळांनी पाठवलेल्या पेढ्यांविषयी बोलताना, भुजबळांना अनुभवातून गोडपणा आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.  राज ठाकरेंबद्दल बोलताना पक्ष स्थापन करून काय निर्माण केलंय असा उपरोधिक टोला हाणलाय. पक्षाचे मुखपत्र दै. सामनासाठी उद्धव ठाकरे यांन संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे जोरदार बरसले आहेत.

Read More