Marathi News> मुंबई
Advertisement

विक्रोळीत धान्याने भरलेला ट्रक पलटून चौघांचा मृत्यू

धान्याने भरलेला ट्रक पलटी होण्याची दुर्देवी घटना विक्रोळी येथे घडली. 

विक्रोळीत धान्याने भरलेला ट्रक पलटून चौघांचा मृत्यू

मुंबई : धान्याने भरलेला ट्रक पलटी होण्याची दुर्देवी घटना विक्रोळी येथे घडली. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अश्विन हेवारे (32), विशाल शेलार (22), अब्दुल हमीद शेख (42), चंद्रशेखर मुसळे (40) यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर चांद हसन शेख या जखमी व्यक्तीला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. 

विक्रोळीतील सुर्यानगर पोलीस ठाण्याजवळ गटाराचे काम सुरू होते. हे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. अखेर गुरूवारी रात्री या गटारात धान्याने एक ट्रक अडकला. काल रात्री साडेअकराच्या जवळपास धान्याने भरलेला ट्रक अचानक उलटला.  त्याचवेळी त्याठिकाणी उपस्थित असेलले पाच जण ट्रक खाली आले त्यातच चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाला अटक केली असून घटनेची अपघाती नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. 

Read More