Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईतील वाहन प्रवेश महाग, १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ

वाहनचालकांना आता टोलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मुंबईतील वाहन प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग होणार आहे. 

मुंबईतील वाहन प्रवेश महाग, १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ

मुंबई : वाहनचालकांना आता टोलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मुंबईतील वाहन प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग होणार आहे. मुंबईत खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून ५  ते २५ रुपयांपर्यंत वाढीव टोल भरावा लागणार आहे. वाढलेले नवे दर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू असतील.

मुंबई आणि उपनगरातील मुलुंड, दहिसर,ऐरोली, वाशी आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे. एमएमआर भागातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च वसुलीसाठी २००२ ते २०२७ या २५ वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे.

fallbacks

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिसूचनेनुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार कार आणि जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ होऊन टोल आता ४० रुपये होणार आहे. हलक्या वाहनांचा मासिक पासमध्येही १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मासिक पास आता १४०० रुपयांवरुन १५०० रुपये होणार आहे.

फास्टटॅग (FASTag) कुठल्याही बँकेचे घेऊ शकता. यात एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिएस बँक यांचा समावेश आहे. तसेच अॅमेझॉन (Amazon) वरही फास्टटॅग मिळत आहे. तसेच  पेट्रोल पंपवर देखील ही सुविधा मिळू शकते.  

Read More