Marathi News> मुंबई
Advertisement

व्हिडिओ : जोगेश्वरीतील भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत कैद

रस्त्यावरून चालणाऱ्या एका तरुणीला भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं जोरदार धडक दिली आणि... 

व्हिडिओ : जोगेश्वरीतील भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत कैद

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ आहे एका अपघाताचा... मुंबईतील जोगेश्वरी भागात हा भीषण अपघात झालाय. या व्हिडिओत रस्त्यावरून चालणाऱ्या एका तरुणीला भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं जोरदार धडक दिल्याचं दिसतंय. सायली राणे असं या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे. 

सायली राणे  ही तरुणी क्लासमधून घरी परतत असताना एका वेगात येणाऱ्या कारने धडक दिली. त्या धडकेत सायली ही फेकली गेली आणि जवळच्याच झाडावर आदळून गंभीर जखमी झाली... या अपघातात गाडी चालवणारा व्यक्तीही गंभीर जखमी झाला. सायली आणि चालक दोघांनाही तत्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोघांवरही डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. 

जोगेश्वरी भागात ३० डिसेंबर रोजी हा अपघात घडल्याचं समोर येतंय. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. या अपघाताची दृश्यंही अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. 

Read More